आदिवासी लोकजीवन
आदिवासी लोकजीवन
आर्य लोक दंडकारण्य ओलांडून दक्षिणेकडे येण्यापूर्वी या भागात भिल्ल, निषाद, किरात, कोल आणि शबर या वंशाचे लोक राहत होते.
रामायण महाभारताच्या काळापासून जुन्या वाङमयात त्यांचे वर्णन आढळते. आर्यांचे हिंदुस्थानात आगमन होण्यापूर्वी आदिवासी हेच या
देशाचे मूळ रहिवासी होते. त्या काळी आदिवासी टोळ्याटोळ्यांनी राहात होते. इकडे आल्यावर आर्यांनी इथली भूमी काबीज केली.
तेव्हा आदिवासींच्या टोळ्यांपैकी पुष्कळ टोळ्यांनी आर्य लोकांशी जुळवून घेतले. काही टोळ्या लढल्या. झगडल्या. पराभूत झाल्या. स्वत:चे
स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी पर्वतमय प्रदेशातल्या दऱ्याखोऱ्यांत जंगलाच्या आश्रयाला जाऊन राहिल्या. त्यामुळे आदिवासींची
वस्ती आजही प्रामुख्याने जंगलात, डोंगरदऱ्यांच्या प्रदेशात आढळून येते. भारतात आदिवासिंना 'गिरीजन' असेही म्हणतात. किंवा नेहमी
अरण्यात राहणारे म्हणून अरण्यक असेही म्हणतात. भारतीय संविधानाने त्यांना आदिम जाती, जनजाती, अनुसूचित जमाती असे संबोधले आहे.
प्राचीन वन्य टोळ्यांची धार्मिकता आर्यांपेक्षा वेगळी होती. त्यांच्या जगण्याच्या एकूणच कल्पना भिन्न होत्या. ते निसर्गाची पूजा
करीत. निसर्गातल्या आढळून येणाऱ्या आणि त्यांच्या बुद्धीला न उमगणाऱ्या वस्तूला, वृक्षाला किंवा पक्षाला ते देव मानीत. पूज्य
मानलेल्या प्राण्याची शिकार ते करीत नसत. त्यांची ते पूजा करीत. सर्वच आदिवासी टोळ्या निसर्ग आणि प्राणीपुजक होत्या असेच
आपल्याला दिसते. प्रत्येक टोळीचा प्रदेश ठरलेला असे. त्यावर समाज आणि टोळीने घातलेली बंधनं असत. बंधने मोडली की संघर्ष होत. ही
गोष्ट फार प्राचीन नाही, तर अगदी शे-दोनशे वर्षांपर्यंत म्हणजे गोरा साहेब या देशात येईपर्यत आदिवासींमध्ये अशी समाजरचना आस्तित्वात
होती. आदिवासी जमातींचे हे समाज जीवन पाहून त्या काळचे इंग्रज अधिकारी, तत्कालीन धर्मोपदेशक आणि मानववंशशास्रज्ञ फार
प्रभावित झाल्याचे त्यांनी केलेल्या नोंदींवरून दिसते.
इंग्रजी राजवट सुरु झाल्यानंतर चित्र हळूहळू बदलत गेले. सरकारी अधिकारी, ख्रिस्ती मिशनरी आणि मानववंशशास्रज्ञ या भागात फिरू
लागले. शिरगणती करणाऱ्या त्या काळच्या अधिकाऱ्यांना आदिवासींची गणती नेमकी कोणत्या धर्मात करावी, असा प्रश्न पडला होता.
हे लोक जरी हिंदुस्थानातले मूळ रहिवासी असले तरी हिंदू धर्मात त्यांचा समावेश झालेला नव्हता. त्या काळातल्या हिंदूंच्या चातुर्वण्य
समाज पद्धतीत त्यांना कोठेच स्थान नव्हते. आदिवासींचे सांस्कृतिक आणि धार्मिक जीवन हिंदू लोकांपेक्षा वेगळे होते. त्यामुळे ब्रिटीश
अधिकाऱ्यांनी त्यांची गणना प्राणी पूजक अशी केली आहे. पुढे जसजशी हिंदूंशी सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली तसे
जंगलाच्या या राजाचे हिंदूकरण होऊ लागले किंबहुना झाले.
भारतीय मानवावंशशास्रज्ञांनी आदिवासी जमातीची काही ठळक अशी वैशिष्टये सांगितली आहेत. या जमातीचे स्वभाव विशेष
नोंदवताना ते म्हणतात की, निसर्गाचं सानिध्य, लहानशा भागात केलेली वस्ती, स्वतंत्र स्वावलंबी आणि अत्यंत साधी राहणी, मोजक्या
गरजा, साधी साधने-आयुधे, लिपीचा अभाव, मर्यादित आशा-आकांशा, रुढी, विधी, नातेवाईक, गावकरी यांचा व्यक्तींच्या जीवनावर
विशेष प्रभाव दिसून येतो. त्याचबरोबर संकोची आणि बुजरी वृत्ती हीदेखील या समाजाची वैशिष्ट्ये आहेत.
मध्यभारत, बिदर आणि जुने हैद्राबाद यांच्या सरहद्दीवर महादेवाचे डोंगर आहेत. ते डोंगर महादेव कोळी लोकांचे मूळ वस्तीस्थान मानले जाते.
तेथून हैद्राबाद संस्थानाच्या सरहद्दीने हे लोक बालाघाटाचा प्रदेश ओलांडून सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर आले. याबाबत निश्चित
असा काळ सांगता येत नसला तरी इसवीसनाच्या सुरुवातीला ५०० वर्षांच्या काळात कोळी लोक येथे आले असले असावेत. ही जमत
सह्याद्रीच्या घाटावर स्थायीक होण्यापूर्वी येथे घडशी आणि गवळी म्हणजे धनगर लोक राहत होते. महादेव कोळी लोकांनी बालाघाटातून
इथे येऊन या लोकांचा पराभव केला. त्यांचे हल्ले बरीच वर्षे सुरु होते. शेवटी वान्कोजी कोकाट्याने सोनजी गोपाळ या मराठयाच्या मदतीने
तुफान हल्ला चढवला. घडशी आणि गवळी लोकांचे उच्चाटन केले. शरण आलेल्यांना सामावून घेतले काही परागंदा झाले. पुढे महादेव
कोळ्यांनी या प्रदेशात वस्ती केली.
आजमितीस महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्र ३.०७ चौरस किलोमीटर आहे. त्यातील .५० लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र आदिवासी
उपयोजना क्षेत्राखाली येते. राज्याच्या एकूण क्षेत्राशी हे प्रमाण साडेसोळा टक्के आहे. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी आदिवासींची
लोकसंख्या जवळपास दहा टक्के आहे. सह्याद्री पर्वताच्या विभागात महादेव कोळी, वारली, कोकणा, ठाकर, कातकरी आणि मल्हार
कोळी या जमातींची वस्ती आढळते. एके काळी दक्षिणेकडील लोणावळा ते उत्तरेकडील त्र्यंबकगडापर्यंतच्या भागावर महादेव कोळी
टोळ्यांचे राज्य होते. ३० ते ४० मैल हा प्रदेश पसरला आहे. या पट्ट्याची विभागणी नेर, मावळ, डांगाण आणि खोरे अशी केलेली आहे. पुणे
जिल्ह्यात घाटमाथ्यालगत जशी मावळे किंवा नेरे आहेत; तशी हरिश्चंद्रगडाच्या उत्तरेकडील भागांना डांगाण म्हणतात. अकोल्यातला हा
आदिवासी गावांचा पट्टा ४० गाव डांगाण म्हणून प्रसिद्ध आहे.
अकोले तलुक्यातील एकूण १९१ गावापैकी पश्चिमेकडील १०१ गावे आदिवासी उपयोजना क्षेत्रात तर पूर्वेकडील उर्वरित गावे
बिगरआदिवासी पट्ट्यात येतात. काही परिसरात गावे विरळ आहेत तर काही भागात सलग गावे आढळतात. अकोल्यात महादेव कोळी, ठाकर,
भिल्ल, कातकरी आणि रामोशी या आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. महादेव कोळी लोकांचा यात मोठा भरणा आहे. आदिवासी
समाजाची म्हणून जी काही वैशिष्ट्ये म्हणून सांगितली आहेत, त्या वैशिष्ट्यांनी सह्यगिरीच्या कुशीत राहणाऱ्या इथल्या आदिवासी
बांधवांचे जगणे व्यापून टाकले आहे. आणि त्यांच्या परंपरा आणि रीतीभाती त्याला साजेशा अशाच आहेत. सामाजिक एकजिनसीपणा हे या
जमातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य किंवा लक्षण म्हणून सांगता येईल.
शेती -
शेती आणि पशुपालन हे दोन सह्यपर्वताच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील पश्चिम पट्टयातील आदिवासी लोकांच्या जगण्याचे
मुख्य आधार आहेत. याशिवाय जंगलातील निरनिराळी उत्पादने आणि जंगल संपत्ती याचाही हे लोक उदरनिर्वाहासाठी उपयोग होतो. एके
काळी जंगले तोडून शेती करण्याची पद्धती म्हणजे स्थलांतरित शेती करण्याची पद्धती अस्तित्वात होती. आता ही पद्धती बंद होवून
कायमस्वरूपी शेती करण्याकडे आदिवासींचा कल वाढला आहे. पावसाळ्यात या भागात भरपूर पाऊस पडतो. शेतीही प्रामुख्याने
डोंगरउतारावर आणि उंच भागावर केली जाते. शेतीत नागली, वरई, कुळीद, उडीद, खुरसणी, भुईमुग शेळू अशी पिके खरीप हंगामात घेतली
जातात. रब्बी हंगामात गहू, हरभरा, वालवड ही पिके घेतली जातात. थोड्या फार प्रमाणांत पाणी उपलब्ध असल्यास बटाटा आणि इतर
भाजीपाल्याची पिके घेणे सुरु झाले आहे. अलिकडे तालुक्यात झालेली लहानमोठी धरणे, लघुपाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव, विहिरी आणि
पाणी उपसण्यासाठी पाणीयोजना झाल्यामुळे काही शेतकरी खरीपाबरोबरच रब्बीची पिके घेऊ लागलेत. सिंचनाच्या सोयी निर्माण
झाल्याने खरीप आणि रब्बीबरोबरच उन्हाळी हंगामात काही ठिकाणी भुईमूग तसेच कोबी, फ्लावर, वालवड आणि मिरची आदी पिके घेतली
जात आहे.
तिन्ही हंगामातली म्हणजेच बारमाही शेती तालुक्यात काही ठिकाणी सुरु झाली असली, तरी खरीप हंगामात भात खाचरात मोठ्या
प्रमाणावर तांदूळ पिकवला जातो. चिखलणी करून भातलावणी करण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यालाच स्थानिक आदिवासी आवणी
म्हणतात. भात हेच या भागातले मुख्य पिक असून, त्यावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. पावसाळ्याच्या दिवसांत इथला निसर्ग
खुलतो. तेव्हा जिकडे तिकडे सैरावैरा वाहणाऱ्या भन्नाट वाऱ्याबरोबर लवलवणारे, झुळझुळणारे भाताचे तुरे पाहणे हे दृश्य मोठे विलोभनीय
दिसते. आणि म्हणूनच ते निव्वळ पाहण्यातही एक मौज असते.
तांदळाच्या बऱ्याच प्रकारच्या जाती येथे उत्पादित केल्या जातात. त्यात प्रामुख्याने इंद्रायणी, काळभात, जीरवेल, कोळपी या स्थानिक
जातींसह इतर संकरीत जातीचा समावेश आहे. संकरीत वाण आल्यावर तांदळाचे रायभोगसारखे सुवासिक आणि चवदार वाण मात्र आता
जवळपास नष्ट झाल्यात जमा आहे. मुख्यतः ही शेती पावसाच्या पाण्यावर केली जाते. असे असले तरी सुधारीत बी, बियाणे, खते, औषधे यांचा
वापर करून अत्यंत आधुनिक तंत्राच्या साह्याने शेती केली जात आहे.
पशुपालन –
पशुपालन हा शेतीचा महत्त्वाचा जोड धंदा म्हणून केला जातो. विशेषतः डांगी जनावरांचे मोठ्या प्रमाणावर येथे संगोपन केले जाते. या
प्रजातीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ती म्हणजे निसर्गतःच या जनावरांच्या शरीरावरची त्वचा तेलकट असल्याने त्यांच्या शरीरावर पडलेले
पाणी लगेच घरंगळून जाते. त्यामुळे पर्जन्यमान जास्त असले तरी त्याचा या जनावरांना त्रास होत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
डांगी जातीच्या जनावरांच्या पायांच्या खूरांच्या विशिष्ट रचनेमुळे तीव्र उताराच्या किंवा चढणीच्या जागेवरून चालताना या
जनावरांना अडचणी येत नाहीत. येथील वातावरणाशी जुळवून घेणारी जात, अशीच या प्रजातीची ओळख आहे. दर सोमवारी डांगी
जनावरांचा बाजार भरतो. तेथे जनावरांची खरेदी-विक्री होते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात दत्तजयंतीनंतरच्या पहिल्या सोमवारी राजूर येथे
डांगी जनावरांचे मोठे प्रदर्शन भरते. काही पशुपालक मुद्दामहून बाजारात विकण्यासाठी गोऱ्हे तयार करतात. त्यांना मोठी मागणी असते.
चांगले पैसे मोजून ग्राहक ही खरेदी करतात. हजारो जनावरे तेथे विकायला आणली जातात. काही कोटीं रुपयांच्या घरात इथे उलाढाल होते.
या भागातल्या डांगी जनावरांच्या दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या खव्याचे पेढे राज्यभर प्रसिद्ध आहेत. त्याची गोडी खाणाऱ्याच्या
जिभेवर रेंगाळत राहते. 'राजूरचे पेढे' या नावाने ते प्रसिद्ध आहेत. भंडारदर्याला येणारे अनेक पर्यटक राजुरचे पेढे खरेदी केल्याशिवाय माघारी
जात नाहीत. राजूरला पेढ्याची बरीच दुकाने आहेत. परंतु येथील नवाळी बाबाच्या पेढ्यांवर खव्वयांच्या पसंदीची मोहर उमटली आहे.
याशिवाय येथील खव्यालाही राज्यभरातून चांगली मागणी असते. विशेषतः येथील खवा नाशिक, शिर्डी, पुणे आदी ठिकाणी पाठविला
जातो. विशेषतः तालुक्यातील खिरविरे, कोंभाळणे, बाभूळवंडी, कोकणवाडी, तिरडे, पेढेवाडी आणि सांगवी या भागात खव्याचे चांगले
उत्पादन घेतले जाते. पूर्वी येथील जंगलात गाईगुरे चारण्यावर फारशी बंधने नसत. अलीकडे मात्र निरनिरळ्या कायद्यांमुळे काही बंधने आली
आहेत. याच प्रतिकूल परिणाम पशुपालनावरही झालेला दिसून येतो. आवळा, हिरडा-बेहडा, जांभूळ, आंबा, फणस, बांबू, सादडा, कारवी या
वनस्पतींपासून उत्पादन मिळते.
वर्षांनुवर्षे अलिप्त राहिल्याने हा समाज काहीसा स्व-केंद्रित झाला आहे. परंतु अलिकडच्या काळात येथे सुधारणांचे वारे जोरात वाहू
लागले आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा याच्या जोखडात अडकलेल्या समाजापर्यंत शिक्षणाचा प्रसार होतो आहे. आश्रमशाळा सुरु झाल्या
आहेत. गावोगावी, वाडी वस्तीवर प्राथमिक शाळा सूरू झाल्या आहेत. आदिवासींची लाजरी बुजरी मुले-मुली धीट होऊ लागली आहेत.
स्वच्छ कपडे घालू लागली आहेत. नाच गाण्याइतकाच शिक्षणात रस घेऊ लागली आहेत. आदिवासी स्री-पुरुषांच्या चेहऱ्यावरील भेकड भाव
हळूहळू कमी होतो आहे. शिक्षणाने आणलेली आदिवासींच्या जीवनातील ही पहाट आशादायी आहे.
स्थानिक परिसरातली बोलीभाषा म्हणजे त्या त्या समाजाच्या जीवनाचे प्रतिबिंब असते. येथील लोक त्यांच्या स्थानिक बोली भाषा
बोलतात. खासकरून ठाकर समाजाची बोली प्रचलित मराठी पेक्षा निराळी आहे. महादेव कोळी लोक बोलतात ती बोलीदेखील
मराठीपेक्षा वेगळी आहे. असे असले तरी नवी पिढी जसजशी शिकू लागली आहे. तशी बोली बोलणाऱ्यांची संख्या कमी होते आहे.
सभोवतालच्या लोकजीवनाच्या मराठी बोलीभाषेचा वापर हीच त्यांची अधिकृत भाषा बनली आहे.
इथल्या महादेव कोळी समाजाचा आणखीन एक विशेष म्हणजे या लोकांची आडनावे ही प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या नावावरून पडलेली
आहेत. कवटे, झाडे, सुपे, मोरे, शिंगाडे, बुरुड, वाघ, मोहंडूळे. महादेव कोळी लोक स्वतःला हिंदू म्हणवतात. मारुती, बहिरोबा, हिरावबा, चेडा,
मुंजा, वेताळ, कान्होबा, खंडोबा आणि भवानी यासारख्या ग्रामदैवतांची ते पूजा बांधतात. याशिवाय हिरवा देव, वन देव, वाघ्या,
यांचीही ते पूजा करतात. सर्व पित्री आमावस्या, वाघबारस, आणि होळी हे आदिवासी बांधवांचे महत्त्वाचे असण आहेत.
महादेव कोळी समाजात परंपरेला प्राधान्य आहे. परंपरेचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कथा, काव्य, नृत्य, गाणी इत्यादी
लोकसाहित्य आणि कलांच्या माध्यमाद्वारे जातो आहे. ढोलनृत्य, शिमगा नाच, तमाशा, जात्यावरची दळणाची गाणी, भलरी, गुराखी
गीते, बोहाडा, लग्नाची गाणी असे या लोकांचे सांस्कृतिक जगणे अतिशय समृद्ध असे होते. मात्र अलीकडे सुशिक्षित आदिवासी पोरा-
पोरींना नाच-गाण्याची लाज वाटू लागली आहे. त्यामुळे ही समृद्ध परंपरा आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
पूर्वेकडील बिगर आदिवासी पट्टा मात्र या लोकजीवनापेक्षा संपूर्णतः निराळा आहे. आधुनिकतेची कास धरणारा, अत्यंत प्रगत तंत्राने शेती
करणारा इथला शेतकरी आहे. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाल्याने आणि त्याचे महत्त्व समजल्याने इथल्या लोकांच्या जगण्यावर त्या
गोष्टींचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. शेती, संस्कृती, उपजीविकेची साधने, भाषा, वेशभूषा, घरे, आहार अशा बहुसंख्य बाबतीत आदिवासी
आणि बिगर आदिवासी यांच्यात फरक दिसतो. हे दोन समाज एकाच तालुक्याच्या पाठीवर राहत असले तरी पूर्ण भिन्न प्रकृतीचे ते आहेत.

Comments
Post a Comment