जागतिक आदिवासी दिवस अहवाल ∙

 ·        जागतिक आदिवासी दिवस अहवाल ∙  

            आज दिनांक ०९/०८/२०२१रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त, ऑल इंडिया आदिवासी एम्पाएज फेडरेशन चाळीसगाव तालुका कमेटी, आदिवासी नोकर वर्ग, आदिवासी शिक्षक संघटना चाळीसगाव व एकलव्य कर्मचारी संघटना यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आदिवासीं साहित्य अकादमी कार्यालय टाकळी येथे कोविड नियमांचे पालन करून साधेपणानें साजरा करण्यात आला.

यात सर्वप्रथम मा. सुनील गायकवाड सरांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मा. पाडवी सर (प्रा.आरोग्य केंद्र उपखेड) यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पाडवी सर व मा. के. के. पावरा (आश्रम शाळा वलठान) यांच्या हस्ते आदिवासी महा दंडनायक एकलव्य व खोज्या राजा भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

        या वेळी आदिवासी शिक्षक नवनाथ पवार व मधु गुमाडे सर नेट सेट परीक्षा पास झाल्याने त्यांचा सन्मान के. के. पावरा सर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मा. नवनाथ पवार (प्रा. शि. सांगवी) सरांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्व व आदिवासी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी  यावर प्रकाश टाकला तर मा. मधु गुमाडे सरांनी आदिवासींचा इतिहास कशाप्रकारे चुकीचा लिहिला गेला, श्रेयवाद आणि आदिवासी समाजाला कसे डावलले जाते. यावर उदाहरणासह प्रकाश टाकला.

          त्यानंतर मा. प्रा. शरद पवार सर (आश्रम शाळा मेहुणबारे) यांनी संघटन का हवे आणि ते मजबूत करण्यासाठी काय करता येईल? याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मा. हर्षित वळवी सर (कुंझर) यांनी समाजासाठी उत्पादक क्षेत्राची गरज व सहभागीता वाढविण्याची गरज याविषयावर मार्गदशन केले.

          मा. प्रा. लक्ष्मण वळवी सर (खडकी) यांनी १९३५ चा कायदा ते भूमिहीन आदिवासी या दरम्यानचा समाजाचा प्रवास व पुढील संभाव्य धोके यावर मार्गदर्शन व चिंता व्यक्त केली. ते बोलत असताना समाजपरिवर्तनाची तळमळ दिसली. तसेच ते अभ्यासपुर्ण बोलत होते. अशा अभ्यासु आणि चिकित्सक व्यक्तीमत्वाच्या लोकांची आज आपल्या समाजाला गरज आहे. आगामी काळात आपल्याला आपल्या हक्कासाठी आंदोलन/चळवळ करण्यास भाग पाडले जाईल. आणि या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याचे गुण त्यांच्यात दिसले.

          समारोपाच्या भाषणात आदिवासी साहित्यिक, कवी आणि ज्यांची कविता “भारत सरकार आयोजित साहित्य अकादमी दिल्ली” येथे ७५ साहित्यिकांमधून सर्वप्रथम सादर झाली असे आदिवासी रत्न मा. सुनील गायकवाड सर(कजगाव), यांनी आदिवासी राजा खोजा भील आणि क्रांतिकारक खाज्या नाईक या व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला. तसेच सामाजिक कार्यात येणाऱ्या अडचणी व त्यांच्या साहित्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. सरांकडे पाहिल्यावर कोणीही विचारात पडतो की ‘हेच ते साहित्यिक आहेत ज्यांचे डझनभरच्या वर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.’ सरांच्या अभ्यास त्यांच्या बोलण्यातून झळकत होता.

अशाप्रकारे शेवटी मा. सुनील गायकवाड सरांच्या परिवाराने घरीच तयार केलेल्या अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

 यावेळी प्रा. जितेंद्र सोनवणे, जयराम सोनवणे सर, किशोर सोनवणे सर, सुरेश बारेला सर, संजू पावरा, विक्रम महाले सर, शेवाळे सर, इतर नोकरदार वर्ग व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

             



शब्दांकन :- मा. विक्रम महाले सर, मा. प्रा. शरद पवार सर

संकलन व संपादन:- मा. नवनाथ पवार सर.

http://navnathpawar24.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

जागे व्हा

माझा पहिला विमान प्रवास

आदिवासी लोकजीवन