Posts

जागे व्हा

🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾  माननीय  बापू राऊत यांचा अग्रलेख अत्यंत आभ्यास पुर्ण व आदिवासी समाजाचे आजची वास्तविकता दर्शवीणारा आहे. आदिवासी अंदोलन या पुढे ऐतीहासीक क्रांतीकारी दिशेने वाटचाल करीत आहे त्यास समाजातील आशीच विचारवंत  दिशा देतील सामान्य माणुसच क्रान्ति घडवणार व दिशा देणार आभार व्यक्त करतो माननीय बापु राऊता चे त्यांनी आपले विचारधन समाजाला वाटले कृपया माननीय बापु राऊता यांचा मोबाईल नंबर खाली दिला आहे त्यावर संपर्क साधुन लेखकाचे आभार मांडा कारण येवढे वास्तव मांडताना समाजाचा खोलवर आभ्यास लागतो व आदिवासी चळवळीत स्वताला झोकुन देणारी व्यक्तीच वास्तव मांडत आसते पुनःचछा धन्यवाद देतो माननीय बापु राऊत यानां...... माननीय बापू राऊत यांचा अग्रलेख साभर आपल्या माहीती साठी सादर....... ✒ आदिवासीसाठी धोक्याची घंटा: एक दृष्टीक्षेप –---------------------------------------- ( दै. महानायक व दै. मूलनिवासी मध्ये प्रकाशित) आदिवासी समुदायाचा इतिहास हा त्यांच्या स्वतंत्र धर्म, संस्कृती, समृध्दी व भाषेचा इतिहास आहे. त्यांच्या  स्वतंत्र लोकशाही पध्दतीमध्ये समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य याचे

जागतिक आदिवासी दिवस अहवाल ∙

Image
  ·         जागतिक आदिवासी दिवस अहवाल ∙               आज दिनांक ०९/०८/२०२१रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त , ऑल इंडिया आदिवासी एम्पाएज फेडरेशन चाळीसगाव तालुका कमेटी , आदिवासी नोकर वर्ग, आदिवासी शिक्षक संघटना चाळीसगाव व एकलव्य कर्मचारी संघटना यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आदिवासीं साहित्य अकादमी कार्यालय टाकळी येथे कोविड नियमांचे पालन करून साधेपणानें साजरा करण्यात आला. यात सर्वप्रथम मा. सुनील गायकवाड सरांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मा. पाडवी सर (प्रा.आरोग्य केंद्र उपखेड) यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पाडवी सर व मा. के. के. पावरा (आश्रम शाळा वलठान) यांच्या हस्ते आदिवासी महा दंडनायक एकलव्य व खोज्या राजा भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.         या वेळी आदिवासी शिक्षक नवनाथ पवार व मधु गुमाडे सर नेट सेट परीक्षा पास झाल्याने त्यांचा सन्मान के. के. पावरा सर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मा. नवनाथ पवार (प्रा. शि. सांगवी) सरांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्व व आदिवासी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अ
आदिवासी एकता परिषद आयोजित  आदिवासी सांस्कृतिक महासम्मेलन , पालघर  संपूर्ण अहवाल *जोहार।।* 1945 से1947 के आदिवासीओं का स्वतंत्रता संग्राम.!  7 जनवरी 1947को  नानीवली में शहीद आदिवासी  वीरों के याद में *तारीख 13/01/2020से 14/01/2020 को पालघर के नानीवली गाँवमें  आदिवासी समाजने रचा इतिहास।* ⏩ *13जनवरी2020 शाम 8:00  जिले के कोने कोने से नानीवली गाँव में लोग इकठ्ठा हुए।* ⏩ *आदिवासि एकता परिषद की झुझारू  महिला कार्यकर्ता पूनम कोल द्वारा क्रान्तिवीरोंकी प्रतिमाओं का आरती पूजन हुआ।* ⏩ *नानीवली गांवके वरिष्ठ कार्यकर्ता आप रघु वळवि द्वारा टंटया मामा के प्रतिमा को माला अर्पण आप रमेश सवरा द्वारा एकलव्य के प्रतिमा को माला अर्पण*जिला स्तरीय संमेलन अध्यक्ष आप.बालकृष्ण धोड़ी कर कमलो से धरती आबा बिरसा मुंडा के  प्रतिमा को *माला पहनाई।* ⏩ *इस के बाद सामूहिक  धरती गीत " नही भुलजी आमु'"  हुआ।*   ⏩ *आदिवासी वीर शाहिद स्मारक के अध्यक्ष के    आदिवासि एकता परिषद के जिला सचिव एवं केंद्रीय कार्यालय संचालक ,आदिवासि समन्वय मंच के पश्चिम भारत के समन्वयक आप.डॉ. सुनिल बाल

अंदमान व निकोबार सरना समिती आयोजित मिशन इंडीजीनस फोरम

Image
सेमिनार साठी दिलेले ओळखपत्र (Demand for Inclusion of Tribals Religion Code / Column in the Census Proforma 2021) २०२१ च्या जनगणना प्रपत्रात आदिवासी किंवा अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र धर्म कोड असावा यासाठी दिनांक २४ व २५ ऑगस्ट २०१९ रोजी अंदमान व निकोबार सरना समिती आयोजित मिशन इंडिजिनस फोरम ठिकाण:- छोटानागपूर भवन, पोर्ट-ब्लेयर, दक्षिण अंदमान. राष्ट्रीय आदिवासी इंडिजिनस धर्म समन्वय समिती, भारत, दोन दिवसीय चर्चासत्रातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे     १) धीरज भगतसिंग:- यांच्या म्हणण्यानुसार धर्म-कोडची मागणी आवश्यकता, देशातील प्रमुख राजकीय पक्ष,  ब्राह्मणवादी धोरणे यांना विरोध करणे गरजेचे आहे. दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन करणे, सर्व राज्य- देशातील आदिवासी समाज एकत्र आला आहे. गावागावात या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. आदिवासी आणि धर्म - प्रकृती धर्म आहे. धर्माचे अनुकरण केले तर तो त्या धर्माचा अनुयायी होतो. गोंडी भाषां, गोंडा - वामन ..... शिवराम आपटे यांनी तीस वर्षांपूर्वी आदिवासी शब्द वापरला जे ब्राह्मण होते. त्यानंतर महात्मा गांधी,  ठक्करबाप्पा यांनी तो शब्द रूढ केला.  आदिवासी ST, SC

माझा पहिला विमान प्रवास

Image
रानकवी तुकाराम धांडे यांच्यासोबत सेल्फी                  अंदमान निकोबार द्वीपसमूहात दोन दिवस आदिवासी धर्म कोड परिषद आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने मुंबई येथून विमानाने अंदमान येथे जायचे ठरवले तेव्हा मला फार आनंद झाला. माझा पहिलाच विमान प्रवास असल्याने पाच दिवस तेथे राहून पर्यटन स्थळे पहायची होती म्हणून त्या दृष्टीने तयारी केली. बॅग, कपडे, वैयक्तिक नोंदीसाठी नोंदवही, आवश्यक सामान घेऊन रेल्वेने दि.२३ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री १:०० वाजता मुंबई येथे पोहचलो. माझ्या सोबत माझे मित्र  मधु गुमाडे, त्यांचे चुलत भाऊ विष्णू गुमाडे व मामा महादू गातवे होते. आम्ही मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळावर पोहचलो. तेथे रानकवी तुकाराम धांडे भेटले , त्यांच्यासोबत थोडावेळ गप्पा मारल्या. त्यांच्याकडे बघून एवढे मोठे व्यक्तिमत्व इतके साधे कसे राहू शकते? असा प्रश्न पडतो.                 वेटिंग रूम, मुंबई            भव्य विमानतळ पहिल्यांदा पाहत असल्याने फार आनंद झाला. इंडिगो कंपनीचे तिकीट होते, त्यांचे विमानात सेल्फी. विमानातून मुंबई बोर्डिंग पास घेतले. सुरक्षा

आदिवासी लोकजीवन

आदिवासी लोकजीवन आर्य लोक दंडकारण्य ओलांडून दक्षिणेकडे येण्यापूर्वी या भागात भिल्ल, निषाद, किरात, कोल आणि शबर या वंशाचे लोक राहत होते. रामायण महाभारताच्या काळापासून जुन्या वाङमयात त्यांचे वर्णन आढळते. आर्यांचे हिंदुस्थानात आगमन होण्यापूर्वी आदिवासी हेच या देशाचे मूळ रहिवासी होते. त्या काळी आदिवासी टोळ्याटोळ्यांनी राहात होते. इकडे आल्यावर आर्यांनी इथली भूमी काबीज केली. तेव्हा आदिवासींच्या टोळ्यांपैकी पुष्कळ टोळ्यांनी आर्य लोकांशी जुळवून घेतले. काही टोळ्या लढल्या. झगडल्या. पराभूत झाल्या. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी पर्वतमय प्रदेशातल्या दऱ्याखोऱ्यांत जंगलाच्या आश्रयाला जाऊन राहिल्या. त्यामुळे आदिवासींची वस्ती आजही प्रामुख्याने जंगलात, डोंगरदऱ्यांच्या प्रदेशात आढळून येते. भारतात आदिवासिंना 'गिरीजन' असेही म्हणतात. किंवा नेहमी अरण्यात राहणारे म्हणून अरण्यक असेही म्हणतात. भारतीय संविधानाने त्यांना आदिम जाती, जनजाती, अनुसूचित जमाती असे संबोधले आहे. प्राचीन वन्य टोळ्यांची धार्मिकता आर्यांपेक्षा वेगळी होती. त्यांच्या जगण्याच्या एकूणच कल्पना भिन्न होत्या. ते निसर्गाची