माझा पहिला विमान प्रवास

रानकवी तुकाराम धांडे यांच्यासोबत सेल्फी
                 अंदमान निकोबार द्वीपसमूहात दोन दिवस आदिवासी धर्म कोड परिषद आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने मुंबई येथून विमानाने अंदमान येथे जायचे ठरवले तेव्हा मला फार आनंद झाला. माझा पहिलाच विमान प्रवास असल्याने पाच दिवस तेथे राहून पर्यटन स्थळे पहायची होती म्हणून त्या दृष्टीने तयारी केली. बॅग, कपडे, वैयक्तिक नोंदीसाठी नोंदवही, आवश्यक सामान घेऊन रेल्वेने दि.२३ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री १:०० वाजता मुंबई येथे पोहचलो. माझ्या सोबत माझे मित्र  मधु गुमाडे, त्यांचे चुलत भाऊ विष्णू गुमाडे व मामा महादू गातवे होते. आम्ही मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळावर पोहचलो. तेथे रानकवी तुकाराम धांडे भेटले , त्यांच्यासोबत थोडावेळ गप्पा मारल्या. त्यांच्याकडे बघून एवढे मोठे व्यक्तिमत्व इतके साधे कसे राहू शकते? असा प्रश्न पडतो.
               
वेटिंग रूम, मुंबई
           भव्य विमानतळ पहिल्यांदा पाहत असल्याने फार आनंद झाला. इंडिगो कंपनीचे तिकीट होते, त्यांचे

विमानात सेल्फी.
विमानातून मुंबई
बोर्डिंग पास घेतले. सुरक्षा तपासणी होऊन हैदराबाद येथे जाणारे विमान लागले होते त्या गेटवर आम्ही जमलो. मुंबई येथून आमचा एकूण ४७ लोकांचा ग्रुप एकत्र होता. आमच्या प्रस्थानाची वेळ दि.२४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ६.१५ ची होती. वेळ झाल्याबरोबर आनंदाने रांगेतून बसने जाऊन विमानात बसलो.  तिथे गेल्यावर विमानाचे फोटो काढणे, सेल्फी घेण्याची चढाओढ सुरू झाली. कारण सर्वजण पहिल्यांदा विमानात बसणार होते. कर्मचाऱ्यांनी आम्हाला आमच्या जागेवर बसवले. विमानात हवाई सुंदरी असलेल्या मुलींनी ओळख करून देत आमचे स्वागत केले. विमान सुरू होण्यापूर्वी त्यांनी सर्व सुरक्षित प्रवासाबद्दल माहिती दिली. खिडकीतून बाहेर पाहत असताना अनेक विमाने दिसत होती. उड्डाणासाठी विमान धावपट्टीवर धावायला लागले तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले. धावत जाऊन विमानानाने आकाशात झेप घेतली तसे बाहेर पाहू लागलो तर  शहरातील इमारती, झाडे लहान दिसू लागली. खूप दूरवर पसरलेला परिसर दिसू लागला तेव्हा आपण उंचावर जात असल्याची जाणीव झाली. मन आनंदाने भरून गेले होते. विमान ढगांच्या वरून जात होते काचेच्या बाहेर ढगांचे पुंजके दिसत होते. ढग विविध आकारात उठून दिसत होते. विमान जेव्हा ढगातून जायचे तेव्हा काहीच दिसत नसे. ढगांच्या बाहेर आल्यावर वरती पळणारे काळे काळे ढग दिसायचे. समोर व खाली पाहिले तर जसे त्या दूरचित्रवाणीवर लागणाऱ्या धार्मिक मालिकांमध्ये जसा स्वर्ग असतो त्याप्रमाणे स्वर्गीय रमणीय वातावरण निर्माण झालेले दिसून येते. निरभ्र आकाश क्षितिजावर दूरवर पसरलेले दिसून मनाला फार आनंद वाटत होता. विमानातील त्या सुंदर मुली चहा, खाण्याचे पदार्थ घेऊन येत त्यांची बोलण्याची पद्धत, पोशाख  खूपच आकर्षक वाटतो.  हैदराबाद विमानतळ आले तसे विमान खाली येऊ लागले तेव्हा त्याची जाणीव झाली वरती उंच आकाशात विमान जाताना स्थिर वाटते पण जेव्हा विमान उतरायला लागते तेव्हा प्रवासी सावध असतात धावपट्टीवर उतरून धावत जात विमान थांबले. हैद्राबाद विमानतळावर आम्ही उतरलो. विमानप्रवासाचा आनंद मनात मावत नव्हता. हैद्राबाद येथे दोन तास थांबल्यानंतर विमानाने पोर्ट ब्लेयर कडे उड्डाण घेतले. समुद्रावरून जाताना अथांग पाणी दिसत होते. वेगवेगळे बेट, निळेशार पाणी, फेसाळणाऱ्या लाटा दिसत होत्या. हवामान खराब आहे असे सांगितले जात होते तेव्हा मनात भीती वाटायची विमान खूप उंचावर गेले तेव्हा कानात दडे बसल्याप्रमाणे वाटू लागले. जसे प्रवासात गाडी लागते तसे विमान लागल्यावर उलटी करायला आम्ही पिशवी घेतली होती तसे तिथे एक पाकीट पण होते. पोटात तसे वाटले पण विमान काही लागले नाही. पोर्ट ब्लेयर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही उतरलो. एका हॉटेलमध्ये राहायची व्यवस्था केली. दोन दिवस  छोटा नागपूर भवन येथे राष्ट्रीय आदिवासी धर्म कोड समिती व अंदमान निकोबार सरणा धर्म समिती यांनी आयोजन केले होते त्यात देशातील विविध राज्यातील आलेल्या आदिवासी बांधवांनी आपले विचार मांडले. 
         



दुसऱ्या दिवशी आम्ही जारवा जमातीचे लोक पाहावे या उद्देशाने बसने प्रवासाला निघालो. हे ठिकाण पोर्ट ब्लेयर पासून 130 किमी अंतरावर असल्याने मोठया जंगलातून एक रस्ता तिकडे जातो. रस्त्याने जाताना वाटेत चर्च, दफनभूमी, नारळ, सुपारीच्या बागा दिसल्या. जारवा क्षेत्र लागल्यावर पोलीस चौकी लागते तिथून सोबत पोलीस आपल्या वाहनात बसतो. जारवा ही अतिप्राचीन जमात असून तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे म्हणून पूर्ण परिसरात बाह्य व्यक्तीला प्रवेश बंद केला आहे. त्या जंगलात एकूण 500 च्या आसपास त्या लोकांची संख्या समजली जाते. निग्रो वंशाचे हे आदिवासी 55 हजार वर्षांपासून वास्तव्य करतात. जंगलात झोपडी करून समूहाने राहतात. त्यांच्या अंगावर कपडे नसतात. त्यांच्या हातात धनुष्य बाण, भाले असतात. जारवाना सरकारने अन्नधान्य,घरे,शाळा, दवाखाने उपलब्ध करून दिले आहे तरी त्याचा वापर ते करत नाही. रस्त्याचे काम चालू असताना इतर माणसे त्यांना विविध वस्तू देत त्यामुळे ते रस्त्यावर येतात. सरकारने त्यांना व पर्यटकांना त्यांच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांच्याशी बोलणे, भेटणे यावर बंदी घातली आहे. त्या भागाचे मूळ मालक असून त्यांना त्यांच्या पद्धतीने जीवन जगू दिले जाते त्यांच्यात वस्तू विनिमय पद्धत प्रचलित आहे. माणसे शिकार करतात तर बायका कंदमुळे, फळे, मध गोळा करून त्यावर जगतात. असे हे काळे रंग असलेले जारवा पाहून अशमयुगातील मानवाची आठवण झाली.
             एक दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप येथे बोटीने जाऊन तेथील जुने कारागृह, चर्च अवशेष दिसून येतात.

या बेटावर भरपूर हरणे, ससे, मोर आहेत ते हरणे माणसाजवळ येतात. स्वराज द्वीप येथे वेगवेगळ्या पाण्यातील कृती करता येतात. स्कुबा ड्रायव्हिंग, काचेतून समुद्रांत पाहणे, बाईक ड्रायव्हिंग असे विविध व रोमांचकारी अनुभव घेता आले.
            पोर्ट ब्लेयर शहरात स्वातंत्र्य वीर सावरकर, रामजी भांगरे यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिलेले सेल्युलर कारागृहात आम्ही आलो. अखंड ठेवणारी ज्योत, तीन मजली भक्कम तटबंदी असलेले कारागृह पाहून त्या वीरांची आठवण येते. पटकन जाऊन त्या सावरकर कोठडीत जाऊन थांबलो. त्यांचे ते'कमला'काव्य एका कागदावर लिहून ठेवलेले आहे. त्यांना आदरांजली वाहिली. या शहरातील प्राचीन ओळख असलेले आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देणारे संग्रहालय पाहिले. 
              निकोबार द्वीपसमूहात 35 बेटे आहेत तिथेही अतिप्राचीन जमाती असून त्या आजच्या युगात जगापासून दूर आहेत. ते माणसांना त्या बेटावर येऊ देत नाही. सेंटिनल, अंदमान, निकोबारी आदिवासी मंगोलियन वंशाचे असून रंगाने ते गोरे आहेत. त्यांची वेगळी ओळख त्यांनी जपली आहे. असा समुद्रकिनारा, असंख्य बेटे, निसर्गसौंदर्य, प्राणी जगत  हे सारे पाहिले तर भारताचा स्वर्ग आहे असे वाटते. विमानानाने पुन्हा हैदराबाद मार्गे मुंबईत आलो.माझा हा पहिलाच विमान प्रवास आनंददायी झाला. या एकूण प्रवासासाठी प्रयत्न करणारे व नियोजन करणारे यशवंत पारधी सरांचे मनपूर्वक आभार , आपल्यामुळे हा अनुभव घेता आला.....
(दि.२४ते२७ऑगस्ट२०१९)

Comments

  1. अतिशय साध्या, सरळ भाषेत,हृदयापासून व मनापासून लिहिलेले प्रवासवर्णन
    सरजी तुमच्यातील भावी लेखक आम्हाला जाणवला

    ReplyDelete
  2. खुपच छान प्रवासवर्णन !!

    ReplyDelete
  3. छान लेखन .... अभिनंदन!

    ReplyDelete
  4. खुप छान प्रवासवर्णन केलात...��������

    ReplyDelete
  5. सुंदर प्रवास;सुंदर लोक आणि तितकाच सुंदर अनुभव.👌🌹🌹🌹🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जागे व्हा

आदिवासी लोकजीवन