अंदमान व निकोबार सरना समिती आयोजित मिशन इंडीजीनस फोरम

सेमिनार साठी दिलेले ओळखपत्र
(Demand for Inclusion of Tribals Religion Code / Column in the Census Proforma 2021) २०२१ च्या जनगणना प्रपत्रात आदिवासी किंवा अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र धर्म कोड असावा यासाठी दिनांक २४ व २५ ऑगस्ट २०१९ रोजी अंदमान व निकोबार सरना समिती आयोजित मिशन इंडिजिनस फोरम ठिकाण:- छोटानागपूर भवन, पोर्ट-ब्लेयर, दक्षिण अंदमान. राष्ट्रीय आदिवासी इंडिजिनस धर्म समन्वय समिती, भारत, दोन दिवसीय चर्चासत्रातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे
    १) धीरज भगतसिंग:- यांच्या म्हणण्यानुसार धर्म-कोडची मागणी आवश्यकता, देशातील प्रमुख राजकीय पक्ष,  ब्राह्मणवादी धोरणे यांना विरोध करणे गरजेचे आहे. दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन करणे, सर्व राज्य- देशातील आदिवासी समाज एकत्र आला आहे. गावागावात या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. आदिवासी आणि धर्म - प्रकृती धर्म आहे. धर्माचे अनुकरण केले तर तो त्या धर्माचा अनुयायी होतो. गोंडी भाषां, गोंडा - वामन ..... शिवराम आपटे यांनी तीस वर्षांपूर्वी आदिवासी शब्द वापरला जे ब्राह्मण होते. त्यानंतर महात्मा गांधी,  ठक्करबाप्पा यांनी तो शब्द रूढ केला.  आदिवासी ST, SC आणि  OBC आधीपासून आहे. आदिवासी शब्द असभ्य  आहे त्यात अपूर्णता आहे.  गोंड शेती करणारे जमाती असून पर्यायी शब्द आहे. गोंडवाना देश प्रत्येक धर्म कायदा हे परंपरा जमाती यानुसार जमातींच्या कायदा चालतो. एसटी  एस टी ना हिंदू कायदा लागू होत नाही सर्व राजे एकत्र येऊन देशाचे कमिटी बनवून कार्यक्रम बनवला पाहिजे त्यासाठी आदिवासी प्रकृतीही शब्द संस्कृत आहे गुगल संदर्भ घ्या त्याच्या कळतं युनोमध्ये भारतात एके आदिवासी राहत नाही असं भारत सरकारने अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सांगितले
   एसटी जनजाति के लोग प्रकृतीला मानवणारे आहेत सर्व जमाती एकच मूळ आहे बैगा, कुंभार, डोरिया, भिलाला, भिल एकच आहेत. पुनम प्रतिवाद आहे. मुंडा मोठ्या जमातीतील पण लहान जमाती सह त्यांच्या संस्कृती नष्ट होतील. निसर्गवाद किंवा प्रकृतीवाद जसे चार प्रकारचे रक्तगट आहेत तसेच माणसेही पाच प्रकारचे आहेत. याचे पौर्णिमा व अमावस्या पर्व प्रकृतीवर आधारित आहे. धिरजजींनी गोंड- गोंडी धर्म कोया पुनम या शब्दांवर भर दिला.

२) पुनमजी:- यांनी प्रत्येक धर्म मानव रूपाची पूजा करतो आम्ही कोणत्याही स्वरूपाचे पूजा करत नाही, यावर जोर दिला तर ग्रुप बनवून २०२१ च्या जनगणनेत एक कोड बनवणे,  आदिवासीना देश राज्य यांच्या सीमा बांधू शकत नाही, अशाप्रकारे थोडक्यात त्यांनी आपले विचार मांडले

३) झेलसिंग पावरा महाराष्ट्र:- ५ जानेवारी २०११ नंदाबाई भील प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा  त्यांनी उल्लेख केला. २०१२ मध्ये सर्व जमातीवर अन्याय - अत्याचार होत होता, आदिवासी एकता परिषद १९९४ पासून काम सुरू आहे, यावर फोकस केला त्यानंतर एकलव्य पोस्ट तिकिटावर आहे याचाही उल्लेख केला. जयपाल मुंडा यांनी आदिवासी धर्माची मागणी केली होती परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांचं ऐकलं नाही किंवा ती मागणी मान्य केली या गोष्टींचे त्यांनी आठवण करून दिली


४) तिरुमाल आंध्र प्रदेश:-  यांच्यामते भाषा ज्ञानभंडार संस्कृती सोडल्याने आपली पिढी ओळख विसरून जाण्याची भीती वाटते. नवीन पिढीला भाषा संस्कृती यांची ओळख होणे गरजेचे आहे. आमची संस्कृती वाचवणे आणि इंग्लिश को आयडेंटिफाय करणे पासून जागतिक आदिवासी दिन सुरू केला आंध्र व तेलगू आंदोलन सुगडी लंबाडी लोक एसटीसाठी संघर्ष करत आहेत, महाराष्ट्र व इतर राज्यात एसीमध्ये आहेत तेच एसटीमध्ये येण्याला विरोध करतात, भारतात १९७७ मध्ये एसटीमध्ये नवीन जमाती आल्या आंध्रमध्ये घुसखोरी झाली. नवीन नॉन ट्रायबल लोकांना एसटीत आणून एसटी नष्ट केले जात आहे. यावर जोर दिला तसेच सर्व आदिवासी एकत्र येत नाही, त्यामुळे प्रश्न सुटणे अवघड झाले आहे,  सर्व समाज चर्चा करून प्रश्न सुटणार नाही संस्कृती वाचवणे काम करावे लागेल, कमिटी बनवणे भाषा-संस्कृती वाचवायला घराला शाळा बनवणे, स्वतःला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन न मानता धर्मशिक्षण द्यावे मदरशाप्रमाणे व्यवस्था व्हायला, हवी विविधता जपायला हवी.

५) मराठी साहित्यिक उषाकिरण जी:-  त्यांच्या मते धर्म एक चौकट आहे. सर्व धर्मांनी आदिवासींचे तत्व चोरले व आपला धर्म नाहीसा होत आहे. धर्म ही अशी कृती किंवा चौकट के दुसऱ्यांना दुःख देत नाही जल जंगल व जमीन, बारा कोटी लोकसंख्या, एसटीची फॉर्म धर्म कोड आणला तर संख्या अस्तित्व एकता बळकटी येईल. गमच्छां ही आदिवासींची ओळख सांगितली. त्याच्यानेच आदिवासी संघटना समन्वय होईल.

६) प्रोफेसर तेज कुमार जी पश्चिम बंगाल:- यांच्यामध्ये धर्म चळवळ कार्यकर्ते संख्या वाढत आहे. जयपालसिंहांनी आदिवासी,  प्री मॅट्रिक इंडियनस, या शब्दांचा उल्लेख केल्याचे सांगितले. ज्योती बसू मुख्यमंत्री असताना व भारत सरकार यांनी देशात आदिवासी नाहीत असे म्हटल्याचे सांगितले. जयपालसिंग मुंडा यांनी आदिवासी शब्द वापरण्यास सांगितले, पण  जनजाति शब्द वापरला उच्चभ्रू मानसिकतेतून आलेला आहे, असे त्यांचे मत मांडले. सर्व देशातील लोकांना मान्य होईल असा शब्द घेऊन धर्म कोड लागू करावे. १८७१ पासून जनगणनेत aboriginal धर्म होता. १९३१ ते १९५० आदिवासी धर्म होता. १९५१ ते १९६१ शेडूल ट्राईब या नावाने जनगणना झाली.  इत्यादी गोष्टींवर त्यांनी जोर दिला.

७) नारायण मक्रम यांनी गोंडी धर्म व त्याविषयी माहिती सांगितली त्याच्यात राजा शंभू , ५ खंड धरती, कचारगड,  40 ते 55 गण असतात.  १९५१ च्या निवडणुकांमध्ये एकमेव खासदार बनला. त्यांनी  महात्मा गांधीचे दुनिया बदलण्याआधी स्वतःला  बदला  या वाक्याची आठवण  करून दिली.

८) डॉक्टर उषाताई आत्राम:-  प्राचीन काळी भूमी पोयाम मुलद्व्य म्हणून ओळखले जाई. धरती मातेच्या पोटातून जन्म घेतलेली म्हणजे कोख धरतीमाता व आई-बाबा, महादेव, शंभो मानवतावादी यांविषयी माहिती सांगितली व घेतलेल्या निर्णयाचा फायदा शेवटच्या व्यक्तीपर्यंत गोळा पाहिजे हे महात्मा गांधीचे विचार त्यांनी सांगितले

९) सुभाष तिडके:- ब्रिटिश काळात ग्रामीण सामाजिक आंदोलन सशस्त्र आंदोलन आदिवासींनी केले. गारो,  देवडी 14 जमाती एसटीमध्ये वाढल्या. काही जाती स्वतःला हिंदू धर्माचा भाग मानतात. मंगोलियन वंश (एसटी)  ते आदिवासी धर्माला न म्हणता हिंदू धर्माला म्हणतात. भारत सरकार लोकशाहीने आदिवासींचे जास्त नुकसान झाले आहे. राजकीय नेते आमदार खासदार स्वार्थी असून ते फक्त स्वतःचा विचार करतात. आदि + वासी= आदिम, गोंडी, करिया सरना सर्व धर्म हिंदूधर्म भाग मानतात.  कम्युनिटी 1945 सुभाषचंद्र बोस अंदमान व निकोबार स्वतंत्र झाला झेंडा प्रथम फडकला. याची आठवण करून दिली.

१०) भूपेन चौधरी जी (गुजरात) अध्यक्ष आदिवासी एकता परिषद:-  आदिवासींचे आठशे समुदाय आहेत. सर्वांनी एकत्र राहून काम करणे आवश्यक आहे.  सर्व जग आदिवासी शब्दाला मानतात, तो शब्द धर्म कोड व्हावा, त्याखाली सर्व एसटी जमाती परंपरा याव्यात. मुले कुटुंब यांच्यात आदिवासीत्व आले पाहिजे. सहा धर्म आहे ते आपल्यावर थोपले गेलेत. रामायणातले प्रश्नअभ्यासक्रमात आल्यामुळे आपल्याला रामायणाशी जवळीक वाटते.
११) डॉ. शांती :- धर्म कॉलम मध्ये नाईलाजाने दुसरा धर्म लिहावा लागतो म्हणून धर्म कोड कॉलम मागणी केली जाते. हमारे पुरखोने जो परंपरा दि है, व परंपरा महान होती है.  सण-उत्सव साजरे करतात मंदिर आवडतात, आमचे संस्कार , जन्म, लग्न, मृत्यू यांच्यात परंपरा वापरणे. गीत, वेशभूषा, नृत्य इ. वर जोर दिला.

१२) आसाम च्या प्रतिनिधीनी जारवा अंदमान-निकोबार मध्ये आहेत त्यांचे डीएनए एक आणि आपले एकच आहे. आपले D N A  कुणीही मिटवू शकत नाही  यावर त्यांनी भर दिला. धर्म शब्द आपत्ती येतो इंडीजीनस हा शब्द घ्या आणि आपलं ज्ञान दादा से दादा तक के पुरखोका ज्ञान अपने नाती के नाती तक पहुचाना है असा संदेश दिला.


सारांश:- चौदा राज्यातून आलेलें आदिवासी जमातीचे प्रतिनिधी , विविध संघटनेचे अधिकारी व प्रतिनिधीना आपलें विचार मांडण्याची संधी देण्यात आली . महाराष्टातून महा. आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष प्राचार्य , अशोक बागूल यांना आपलें विचार मांडण्याची संधी मिळाली . त्यांनी आदिवासी धर्म कोड / कॉलम साठी Tribal ( आदिवासी ) शब्दच कसा योग्य आहे हे आपल्या प्रभावी वक्तृत्वतून पटवून दिले . तसेच आदिवासी एकता परिषद , शहादा चे जयसिंग पावरा यांनी , राजस्थानची डॉ . मीना मॅडम , गुजरात चे लालूभाई वसावा , भूपेंद्रभाई चौधरी , आंध्रप्रदेश चे आनंद मळावी यांनी ही Tribal ( आदिवासी ) शब्दावरच जोर दिला .
     मध्ये प्रदेश चे नारायण मलखांब व झारखंडचे उरांव धर्म गुरु के. पी. प्रधान यांनी Tribal ( आदिवासी) शब्दाला विरोध करून गोंड / सरना शब्दाला पसंती दिली . त्यांनी असं पटवून देण्याचा प्रयत्न केला की गोंड ही जात नसून गोंडवाना भूप्रदेश आहे. आणि तिथूनच आदिवासिंची उत्पत्ती झाली आहे . म्हणून कोंकणी , भिल्ल , पावरा शब्दाच्या अगोदर उदा . गोंड कोंकणी , गोंड पावरा असा उल्लेख केला पाहिजे . तसेच झारखंडची उषा मॅडम यांनी ही गोंड जातींचे महत्त्व पटवून देत असताना कोय - पूनम शब्दाला रेटण्याचा प्रयत्न केला.
    दि. 24 व 25 ऑगस्ट 2019 रोजी आदिवासी धर्म कोड / कॉलम परिषद अंदमान - निकोबार येथे दोन्ही दिवस साधक - बाधक चर्चा झाली . सभागृहात उरांव व गोंड जातीचे गोडवे गात असल्याचे प्रकर्षाने जाणवतं होत . सभागृहात जय सेवा , जय जोहार शब्दाचा आवाज ऐकू येत होता . महाराष्ट्रातून नंदुरबार , नाशिक , पुणे , सोलापूर ची मंडळी जय आदिवासी ची घोषणा देत होती . काही काळ सभागृह दोन -तीन गटात विभागले गेले होते . थोड्याच वेळात स्पोर्ट्स ऑफ स्पिरीट दाखवून शेवटी आदिवासी संस्कृती प्रमाणें संयम दाखवून वातावरणात एकोपा निर्माण झाला .
   दि. 25 ऑगस्ट 2019 रोजी सर्वांनुमते 2021 च्या जनगणना मध्ये आदिवासी साठी स्वतंत्र कॉलम व Tribal ( आदिवासी) शब्दाची मागणी करण्याचं विचार एकमताने मंजूर करण्यात आला .
  मला या परिषेदेत सहभागी होता आला म्हणून मनस्वी आनंद होत आहे .

  शब्दांकन :-विष्णू गुमाडे सर

संपादन :- नवनाथ पवार 
मोबाईल :- ९४०३६४७७३७
http://navnathpawar24.blogspot.com
http://9nathpawar.blogspot.com
         


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जागे व्हा

माझा पहिला विमान प्रवास

आदिवासी लोकजीवन