अंदमान व निकोबार सरना समिती आयोजित मिशन इंडीजीनस फोरम

सेमिनार साठी दिलेले ओळखपत्र (Demand for Inclusion of Tribals Religion Code / Column in the Census Proforma 2021) २०२१ च्या जनगणना प्रपत्रात आदिवासी किंवा अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र धर्म कोड असावा यासाठी दिनांक २४ व २५ ऑगस्ट २०१९ रोजी अंदमान व निकोबार सरना समिती आयोजित मिशन इंडिजिनस फोरम ठिकाण:- छोटानागपूर भवन, पोर्ट-ब्लेयर, दक्षिण अंदमान. राष्ट्रीय आदिवासी इंडिजिनस धर्म समन्वय समिती, भारत, दोन दिवसीय चर्चासत्रातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे १) धीरज भगतसिंग:- यांच्या म्हणण्यानुसार धर्म-कोडची मागणी आवश्यकता, देशातील प्रमुख राजकीय पक्ष, ब्राह्मणवादी धोरणे यांना विरोध करणे गरजेचे आहे. दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन करणे, सर्व राज्य- देशातील आदिवासी समाज एकत्र आला आहे. गावागावात या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. आदिवासी आणि धर्म - प्रकृती धर्म आहे. धर्माचे अनुकरण केले तर तो त्या धर्माचा अनुयायी होतो. गोंडी भाषां, गोंडा - वामन ..... शिवराम आपटे यांनी तीस वर्षांपूर्वी आदिवासी शब्द वापरला जे ब्राह्मण होते. त्यानंतर महात्मा गांधी, ठक्करबाप्पा यांनी तो शब्द र...