Posts

Showing posts from 2019

अंदमान व निकोबार सरना समिती आयोजित मिशन इंडीजीनस फोरम

Image
सेमिनार साठी दिलेले ओळखपत्र (Demand for Inclusion of Tribals Religion Code / Column in the Census Proforma 2021) २०२१ च्या जनगणना प्रपत्रात आदिवासी किंवा अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र धर्म कोड असावा यासाठी दिनांक २४ व २५ ऑगस्ट २०१९ रोजी अंदमान व निकोबार सरना समिती आयोजित मिशन इंडिजिनस फोरम ठिकाण:- छोटानागपूर भवन, पोर्ट-ब्लेयर, दक्षिण अंदमान. राष्ट्रीय आदिवासी इंडिजिनस धर्म समन्वय समिती, भारत, दोन दिवसीय चर्चासत्रातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे     १) धीरज भगतसिंग:- यांच्या म्हणण्यानुसार धर्म-कोडची मागणी आवश्यकता, देशातील प्रमुख राजकीय पक्ष,  ब्राह्मणवादी धोरणे यांना विरोध करणे गरजेचे आहे. दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन करणे, सर्व राज्य- देशातील आदिवासी समाज एकत्र आला आहे. गावागावात या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. आदिवासी आणि धर्म - प्रकृती धर्म आहे. धर्माचे अनुकरण केले तर तो त्या धर्माचा अनुयायी होतो. गोंडी भाषां, गोंडा - वामन ..... शिवराम आपटे यांनी तीस वर्षांपूर्वी आदिवासी शब्द वापरला जे ब्राह्मण होते. त्यानंतर महात्मा गांधी,  ठक्करबाप्पा यांनी तो शब्द र...

माझा पहिला विमान प्रवास

Image
रानकवी तुकाराम धांडे यांच्यासोबत सेल्फी                  अंदमान निकोबार द्वीपसमूहात दोन दिवस आदिवासी धर्म कोड परिषद आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने मुंबई येथून विमानाने अंदमान येथे जायचे ठरवले तेव्हा मला फार आनंद झाला. माझा पहिलाच विमान प्रवास असल्याने पाच दिवस तेथे राहून पर्यटन स्थळे पहायची होती म्हणून त्या दृष्टीने तयारी केली. बॅग, कपडे, वैयक्तिक नोंदीसाठी नोंदवही, आवश्यक सामान घेऊन रेल्वेने दि.२३ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री १:०० वाजता मुंबई येथे पोहचलो. माझ्या सोबत माझे मित्र  मधु गुमाडे, त्यांचे चुलत भाऊ विष्णू गुमाडे व मामा महादू गातवे होते. आम्ही मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळावर पोहचलो. तेथे रानकवी तुकाराम धांडे भेटले , त्यांच्यासोबत थोडावेळ गप्पा मारल्या. त्यांच्याकडे बघून एवढे मोठे व्यक्तिमत्व इतके साधे कसे राहू शकते? असा प्रश्न पडतो.                 वेटिंग रूम, मुंबई   ...