आदिवासी लोकजीवन
आदिवासी लोकजीवन आर्य लोक दंडकारण्य ओलांडून दक्षिणेकडे येण्यापूर्वी या भागात भिल्ल, निषाद, किरात, कोल आणि शबर या वंशाचे लोक राहत होते. रामायण महाभारताच्या काळापासून जुन्या वाङमयात त्यांचे वर्णन आढळते. आर्यांचे हिंदुस्थानात आगमन होण्यापूर्वी आदिवासी हेच या देशाचे मूळ रहिवासी होते. त्या काळी आदिवासी टोळ्याटोळ्यांनी राहात होते. इकडे आल्यावर आर्यांनी इथली भूमी काबीज केली. तेव्हा आदिवासींच्या टोळ्यांपैकी पुष्कळ टोळ्यांनी आर्य लोकांशी जुळवून घेतले. काही टोळ्या लढल्या. झगडल्या. पराभूत झाल्या. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी पर्वतमय प्रदेशातल्या दऱ्याखोऱ्यांत जंगलाच्या आश्रयाला जाऊन राहिल्या. त्यामुळे आदिवासींची वस्ती आजही प्रामुख्याने जंगलात, डोंगरदऱ्यांच्या प्रदेशात आढळून येते. भारतात आदिवासिंना 'गिरीजन' असेही म्हणतात. किंवा नेहमी अरण्यात राहणारे म्हणून अरण्यक असेही म्हणतात. भारतीय संविधानाने त्यांना आदिम जाती, जनजाती, अनुसूचित जमाती असे संबोधले आहे. प्राचीन वन्य टोळ्यांची धार्मिकता आर्यांपेक्षा वेगळी होती. त्यांच्या जगण्याच्या एकूणच कल्पना भिन्न होत्या. ते निसर्गाची ...